Next

कोटा येथे पुराच्या पाण्यातून पोलिसाने वाचविला 2 चिमुरड्यांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:58 AM2019-09-16T11:58:12+5:302019-09-16T11:59:02+5:30

कोटा - राजस्थानात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरं पूराच्या पाण्यााखाली आली आहे. कोटा येथील सखळ भागात पाणी साचल्याने ...

कोटा - राजस्थानात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरं पूराच्या पाण्यााखाली आली आहे. कोटा येथील सखळ भागात पाणी साचल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. नागरीवस्तीत पाणी शिरल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहचविण्यासाठी काम सुरु आहे. कोटा येथे एका पोलिसाने दोन चिमुरड्यांचा जीव वाचविल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.