Next

गंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:47 AM2019-09-17T11:47:25+5:302019-09-17T11:48:13+5:30

कटिहार - बिहारच्या कटिहार जिल्ह्यात सोमवारी एक शाळा गंगा नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी शाळेत कोणीही उपस्थित नव्हते. ...

कटिहार - बिहारच्या कटिहार जिल्ह्यात सोमवारी एक शाळा गंगा नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी शाळेत कोणीही उपस्थित नव्हते. पूरपरिस्थिती पाहता सुरक्षेची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने ही शाळा रिकामी केली होती. त्याचदरम्यान गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने किनारी असलेली शाळा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नदीत कोसळली. याचे दृश्य मोबाईल कॅमेरात कैद करण्यात आले.