Next

ऑक्सिजन एक्सप्रेस 37 तासात 1,725 किमी धावली | Oxygen Express | Covid 19 | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 05:35 PM2021-05-12T17:35:57+5:302021-05-12T17:36:38+5:30

राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यासह मागील काही दिवसापासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांचे हाल झाले तर काहींना ऑक्सिजन अभावी प्राणही गमवावे लागले. त्यातच पुणे शहर आणि जिल्हा काही काळ राज्यातील नव्हे तर देशातील कोरोना रुग्णांसाठीहॉट स्पॉट बनले होते. सुदैवाने आता ही रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र तरीही तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुण्यातही तिसऱ्या लाटेची भीती आहे. असं असताना पुण्यासाठी काल रात्री ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :ओदिशापुणेऑक्सिजनकोरोना वायरस बातम्याOdishaPuneOxygen Cylindercorona virus