Next

तीन जागेवर पोटनिवडणूक, विरोधी पक्षनेतेपदाचं गणित काय? Himachal Pradesh, Madhya Pradesh Elections

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:56 AM2021-10-11T11:56:44+5:302021-10-11T11:57:03+5:30

विरोधी पक्षनेता हे पद संसदीय कार्यप्रणालीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. विरोधी पक्षनेता हा सरकारवर वचक ठेवणारा व्यक्ती म्हणून ओळखलाही जातो. विरोधी पक्षनेता जितका सक्षम असतो, तितका त्याचा सरकारवर वचक असतो. पण देशाला गेली सात वर्ष विरोधी पक्षनेता नाहीये.. ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेता हे पद सध्या रिक्त आहे. सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसलाही हे पद मिळवता आलेलं नाही. पण काँग्रेसने सात वर्षांनंतर आता हे पद मिळवण्यासाठी तयारी सुरु केल्याचं दिसतंय.