शिक्षिकेचा अश्लिल व्हिडीओ काढणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:34 IST2019-08-30T16:34:14+5:302019-08-30T16:34:53+5:30
नाशिक - येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही.एन. नाईक महाविद्यालयात शिक्षिकेचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केल्याची ...
नाशिक - येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही.एन. नाईक महाविद्यालयात शिक्षिकेचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.