Next

नाशिकच्या कालिदासमधल्या भोंगळ कारभारानं मराठी कलाकार संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 04:17 PM2019-08-25T16:17:31+5:302019-08-25T16:17:55+5:30

नाशिक : मी प्रचंड आजारी पडल्याने माझा नाशिक आणि ठाण्यातील नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. नाशिकच्या कालिदास नाट्यगृहाने आमच्या नाटकाच्या ...

नाशिक : मी प्रचंड आजारी पडल्याने माझा नाशिक आणि ठाण्यातील नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. नाशिकच्या कालिदास नाट्यगृहाने आमच्या नाटकाच्या भाड्याची पूर्ण रक्कम तसेच डिपॉझिटदेखील जप्त केले, असा उफराटा न्याय आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच बघितलेला नाही. अशाने नाशिकला नाटके आणायलादेखील निर्माते फेरविचार करतील, अशा शब्दांत प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांचा रोष व्यक्त केला.