नाशिकमध्ये बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 17:41 IST2018-07-15T17:41:43+5:302018-07-15T17:41:58+5:30
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये भंडारदरा वनपरिक्षेत्र हद्दीत एका शेतकऱ्याच्या विहिरीत सात महिन्यांची बिबट्याचे पिल्लू पहाटेच्या सुमारास पडले. पाण्याची ...
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये भंडारदरा वनपरिक्षेत्र हद्दीत एका शेतकऱ्याच्या विहिरीत सात महिन्यांची बिबट्याचे पिल्लू पहाटेच्या सुमारास पडले. पाण्याची पातळी जास्त असल्याने बिबट्या गडबडला होता सकाळी शेतकऱ्यांच्या कानावर बिबट्याची डरकाळी पडल्याने त्याने विहिरीत डोकावून बघितले असता कठड्यावर बिबट्या बसलेला दिसला. शेतकऱ्याने तत्काळ इगतपुरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर वनरक्षकांनी रेस्क्यू साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. (व्हिडीओ - अझहर शेख)