बोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 15:49 IST2018-11-19T15:46:13+5:302018-11-19T15:49:06+5:30
नाशिक : राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला बोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर आज मनसे नाशिकच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला बोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर आज मनसे नाशिकच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ड्रीम प्रोजेक्टबाबत मुख्य वन संरक्षक प्रा. वि. नाशिक विजय शेळके यांना घेराव घातला. त्यानंतर शेळके यांनी बोटॅनिकल गार्डनचा विषय माझ्या अखत्यारीत येत नसल्याचं सांगितलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साकारलेला बोटॅनिकल गार्डन प्रोजेक्ट नेमका कोणत्या खात्याच्या अखत्यारित आहे हेच नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांना अजून समजले नाही ही शोकांतिका आहे, असंही शेळके म्हणाले आहेत.