Next

पुन्हा मुख्यमंत्री होणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर राणे म्हणाले... Narayan Rane Vs Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:30 PM2022-01-10T15:30:21+5:302022-01-10T15:30:41+5:30

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे... शिवेसना पक्षप्रमुख Uddhav Thackeray हे गेले दोन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत... तर पुन्हा येणार असा दावा करणारे Devendra Fadnavis गेले दोन वर्ष विरोधी बाकावर आहेत.. विरोधीपक्षनेते पदी आहेत... उद्धव ठाकरे जरी दोन वर्ष मुख्यमंत्रिपदाची गादी सांभाळत असले, तरी वारंवार अनेकांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केलाय... कधी म्हटलं जात की अडीच वर्षांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद जाईल... Supriya Sule मुख्यमंत्री होतील.. तर कधी म्हटलं जातं की अजितदादा हे उपमुख्यमंत्रीपदावरून मुख्यमंत्री होतील... तर कधी पुन्हा शिवसेना भाजप युतीच्या चर्चाही रंगतात.. आणि त्यातूनच कधी Eknath Shinde, तर कधी रश्मी ठाकरे यांच्याही नावांची मुख्यमंत्रिपदी चर्चा होती... या सगळ्या चर्चा आणि शक्यतांच्या गर्दीत पत्रकारांनी Narayan Rane यांना मुख्यमंत्रीपदावरून प्रश्न विचारला.. आणि नारायण राणे यांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना माझा हात बघा असं उत्तर दिलं... राणे असं का म्हणाले? त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय?