Next

नवाब मलिकांना अटक होणार, हे 3 तास आधीच सांगणारे RSSचे Niraj Gunde कोण आहेत? Nawab Malik Arrest

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 04:40 PM2022-02-24T16:40:57+5:302022-02-24T16:41:22+5:30

Nawab Malik Arrest: BJP बुधवारी पहाटे साडेसहा वाजता नवाब मलिकांना अटक झाली. उजाडलं की मलिकांच्या मोहल्ल्यातून त्यांना अटक करणं अवघड होईल म्हणूनच ईडीनं पहाटे साडेसहा वाजता फिल्डिंग लावली होती. आता गंमत अशी आहे की मलिकांना अटक होणार असं एक ट्विट मध्यरात्री ३ वाजता करण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे फडणवीस आणि ठाकरे या दोघांच्या जवळ असणाऱ्या एका व्यक्तीनं हे ट्विट केलं होतं. आणखी धक्कादायक म्हणजे ट्विट करणारी व्यक्ती ही संघाची स्वयंसेवक आहे आणि मलिकांनी याच व्यक्तीवरुन भर पत्रकार परिषदेत आरोप केले होते. फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघांच्या एकाच वेळी जवळ असणारी ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला मलिकांच्या अटकेची खबर कशी लागली, फडणवीस-ठाकरे-मलिक सगळ्यांच्या तोंडी या व्यक्तीचं नाव का आलंय, आता या व्यक्तीनं आणखी एक सूचक ट्विट केलंय ही काय नवी भानगड.. यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात ही व्यक्ती आहे तरी कोण...नमस्कार मी अनिकेत पेंडसे, तुम्ही लोकमत पाहताय. तर मलिकांच्या अटकेआधी ३ तास ट्विट करणारी ही व्यक्ती आहे नीरज गुंडे...