मुळा-मुठेत जीव द्यायला आलेल्या सव्वाशे जणांना या राजा माणसानं ओढलं बाहेर..! Bhima River | Mula-Mutha
 By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 20:41 IST2022-02-13T20:41:41+5:302022-02-13T20:41:56+5:30
'Pune' News : पुणे महापालिकेच्या शेजारी एक अंडाभुर्जीची गाडी लागते.. 'यादे कॉर्नर'.. ही गाडी चालवणारे राजेश काची यांना एक दिवस समोरच असलेल्या नदीपात्रात एका मुलीनं उडी घेतल्याचं समजतं... मग काय, राजेश नदीपात्राकडे धावले.. घाणेरड्या कचऱ्यानं डबडब भरलेल्या नदीपात्रात उडी घेतली आणि त्या आत्महत्या करायला गेलेल्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं! आणि तेव्हापासून आजपर्यंत राजेश यांनी या मुळा-मुठेच्या राजानं मरणाच्या दारातून तब्बल सव्वाशे जीव वाचवले...! आज राजेश यांना पुण्यात 'जीवरक्षक' म्हणून ओळखलं जातं..