युरोपमध्ये तिसरी-चौथी लाट, भारताला इशारा; गाफिल राहू नका... | Corona third wave in India
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 14:24 IST2021-11-16T14:23:55+5:302021-11-16T14:24:25+5:30
सावधान, लवकरच कोरोनाचा उद्रेक? जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं घटतेय. भारतात तिसरी लाट येणार नाही, असं वातावरण तयार झालंय. पण त्याचदरम्यान आता भारताला तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. याचं कारण म्हणजे रशिया, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्ससह युरोपमध्ये कोरोनानं डोकं वर काढलंय. या देशात बूस्टर डोस घेऊनही कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होत नाहीये. या देशातून भारतात आणि भारतातून या देशात विमान सेवा सुरु आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून तिसरी लाट येऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.