Next

'पवारांचा कार्यक्रम होऊच देणार नाही'| खुद्द पवारांच्या कार्यक्रमाला सेनेचा विरोध का? Shivsena vs NCP

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 14:46 IST2022-02-09T14:46:27+5:302022-02-09T14:46:42+5:30

Ajit Pawar पवारांच्या कार्यक्रमाला खुद्द शिवसेनेनं विरोध केलाय. तुम्ही अगदी बरोब्बर ऐकताय. आता पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेना विरोध करतेय म्हणजे नक्कीच काहीतरी सिरीअस कारण असणार. म्हणजे जिल्ह्यातली विकासकामं व्हावीत म्हणून पाठपुरावा केला शिवसेनेनं. पण आडकाठी आणली जातेय स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून. तसा आरोपच शिवसैनिकांकडून होतोय. इतकच नाही तर उद्घाटनालाही राष्ट्रवादीचेच मंत्री आणि खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादांचंच नाव पुढे आहे. त्यामुळे शिवसैनिक दुखावले गेलेत. म्हणूनच पवारांचा कार्यक्रम होऊच देणार नाही असा शड्डू शिवसैनिकांनी ठोकलाय. नेमकं काय झालंय, शिवसैनिकांच्या भावना उद्धव ठाकरे समजून घेतील का यावरच बोलुयात पण सगळ्यात आधी बघुयात कुठे घडलाय हा प्रकार.