Next

सावित्रीबाई फुले यांना 'साध्वी' म्हटलं तर कुठे बिघडलं? Sadhvi Savitribai Phule Udyan | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:49 IST2021-10-02T15:49:10+5:302021-10-02T15:49:26+5:30

पुण्यातल्या एका उद्यानाला साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान संबोधलं गेल्याचं लक्षात आलं आणि एका नव्या वादाला सुरुवात झाली. सावित्रीबाईंच्या नावापुढे साध्वी लावण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यातील ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी यावर सविस्तर पोस्ट लिहिली आणि माध्यमांनी विषय उचलून धरला. उद्यानाच्या फलकाचा फोटो व्हायरल झाला. अनेकांनी हिंदुत्ववादी विशेषण म्हणून साध्वी शब्दाला विरोध केला आणि समता सैनिक दलानं या फलकावरचा साध्वी शब्द रंगवून टाकला.