Next

फडणवीस जिंकले, उत्पल माघार घ्यायला तयार...ठेवली फक्त ‘ही’ अट... | Utpal Parrikar | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:41 PM2022-01-24T14:41:14+5:302022-01-24T14:41:38+5:30

Goa Election 2022 News : पणजीतून तिकीट मिळालं नाही म्हणून उत्पल पर्रीकरांनी भाजप सोडली, बंड पुकारलं. पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोपही केले. उत्पल पर्रीकरांमुळे गोवा भाजपचे प्रभारी म्हणून आलेले देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र वाढत होती. पडद्यामागून आणि अगदी उघडउघडपणेही उत्पल यांची समजूत काढायचा प्रयत्न सुरु होता. आता कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या खेळीला यश येताना दिसतंय. उत्पल पर्रीकर हे माघार घ्यायला तयार झालेत. त्यासाठी त्यांनी एकच अट पक्षासमोर ठेवलीय. खरं तर पर्यायच उत्पल यांनी सुचवलाय. भाजपनं विचार केला तर माघार घेऊ असंही उत्पल म्हणालेत. उत्पल यांनी भाजपसमोर कोणता पर्याय ठेवला, भाजप सोडणारे-बंड पुकारणारे उत्पल नरमले हे फडणवीसांचं यश म्हणायचं का, फडणवीसांची जादू गोव्यात चालली का, गोवा भाजपसमोरची कोंडी फोडण्यात फडणवीस यशस्वी झालेत का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात उत्पल यांनी भाजपसमोर काय पर्याय ठेवलाय ते..