Next

राज यांच्यासमोर पक्षबांधणीसोबत बंडखोरीचं आव्हान | MNS Challenges | Raj Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:25 PM2021-12-17T16:25:22+5:302021-12-17T16:25:40+5:30

Raj Thackeray MNS : राज ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौरा करतायत... गेल्या काही वर्षांत मनसेला वारंवार पराभवाला सामोरं जावं लागलंय... त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही मावळलाय... त्यांची उमेद वाढवण्यासाठी राज ठाकरे फिरत असतानाच, पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय... रुपाली पाटील यांनी मनसेची साथ सोडून हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलंय... त्यामुळे सांडलेलं गोळा करत असतानाच हातातलंही पडतंय अशी काही अवस्था मनसेची झालीय. त्यातच पुण्यातील राजकारण पाहता भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी कशी थोपवायची असा मोठा प्रश्न राज ठाकरेंपुढे उभा राहिलाय... कारण भाजपशी मनसेची युती होतेय की काय असा समज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्याचं दिसून येतंय...