Next

Bullock Cart Race: महाराष्ट्रात या नियमांनुसार होणार बैलगाडा शर्यत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:26 PM2021-12-17T16:26:44+5:302021-12-17T16:27:10+5:30

महाराष्ट्रात गुलाल उधळला जातोय... ढोल-ताशे वाजतायत... फेटे बांधले जातायत... शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.. आणि त्याचं कारण आहे बैलगाडा शर्यतयय महाराष्ट्रातील करोडो लोक ज्या गोष्टी आतुरतेने वाट पाहत होते अखेर ती गोष्ट घडलीय. २०१७ पासून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. ही बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राज्यातल्या शेतकऱ्यानं संघर्ष केला. राज्यातील काही नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न केलेत. राज्य सरकाराने सर्वोच्च न्यायलयात आव्हान दिलं होतं. अखेर आज १६ डिसेंबर २०२१ ला बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायलयानं सशर्त परवानगी दिलीय.