Next

पुण्यात अकरावी प्रवेशाचा प्रश्न का पेटला? | 11th Online Admission Process | Pune | Students Protest

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:44 PM2020-10-27T12:44:01+5:302020-10-27T12:44:29+5:30

पुण्यातील माध्यमिक शिक्षण उपसंचालक येथे अभाविपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. अकरावी प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरु करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असल्यामुळे पालक वर्ग त्रस्त आहे. आतापर्यंत ऑनलाईन प्रथम फेरीमध्ये दोन लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांपैकी एक लाख सतरा हजार पाचशे वीस अर्ज स्वीकारण्यात आले असून ५३, ३८३ प्रवेश निश्चित झाले आहेत. परंतु प्रवेश प्रक्रिया खंडित झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे बाकी आहे. त्यामुळे शासन आता काय भूमिका घेते ते आपल्याला बघावे लागेल त्यासाठी हा व्हिडीओ नक्का बघा -

टॅग्स :विद्यार्थीपुणेपरीक्षामहाराष्ट्रStudentPuneexamMaharashtra