‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना विशेष अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 20:52 IST2018-02-20T20:51:23+5:302018-02-20T20:52:55+5:30
खामगाव- लोकशाहीचा स्तंभ असलेल्या सरपंचांना ग्रामविकासाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने बुलढाण्यातील आदर्श ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मंगळवारी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात ...
खामगाव- लोकशाहीचा स्तंभ असलेल्या सरपंचांना ग्रामविकासाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने बुलढाण्यातील आदर्श ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मंगळवारी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. ‘लोकमत’च्या या उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी उपक्रमातील विविध श्रेणीतील ‘सरपंच अवॉर्ड’ विजेत्या १२ ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा निधीतून प्रत्येकी १ लाख रुपये, तर ‘सरपंच आॅफ द ईयर’ या श्रेणीत पुरस्कार मिळवणा-या पांगरखेड ग्रामपंचायतीला २ लाख रूपये प्रोत्साहन अनुदान प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केली.