२०२१मध्ये कोणत्या 3 राशींच्या मागे साडेसाती आहे? In 2021 which 3 zodiac signs will have Sade sati?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 16:00 IST2021-01-14T16:00:00+5:302021-01-14T16:00:04+5:30
संकट आपला पाठलाग सोडत नसेल, तर आपण म्हणतो, काय साडेसाती मागे लागलीय! होणारे काम होता होत नसेल, तरीही आपण म्हणतो, बहुदा माझी साडेसाती सुरू आहे. आगामी काळात संकटाची चाहूल लागली, तेव्हाही आपले वाक्य हेच, माझी साडेसाती सुरू होणार असे दिसतेय. याचाच अर्थ साडेसाती या शब्दाभोवती काळानुकाळ नकारात्मक पुटं चढत गेली आहेत. २०२१ मध्ये तीन राशींना साडेसातीला सामोरे देखील जावे लागणार आहे. त्या राशी कोणत्या, हे जाणून घेण्याआधी साडेसाती खरोखरच वाईट असते की चांगली, ते समजून घेऊया.