काँग्रेस आमदारांकडून अमरावतीच्या पालकमंत्र्यांचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 17:49 IST2018-12-30T17:29:32+5:302018-12-30T17:49:46+5:30
कोणत्याही मुद्यावर चर्चा न करता डीपीसीची सभा गुंडाळल्याचा आरोप करीत आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांनी ‘भगोडा’ पालकमंत्र्यांचा निषेध असो, असे नारे देत नियोजन भवन दणाणून सोडले.
अमरावती - कोणत्याही मुद्यावर चर्चा न करता डीपीसीची सभा गुंडाळल्याचा आरोप करत आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांनी ‘भगोडा’ पालकमंत्र्यांचा निषेध असो, असे नारे देत नियोजन भवन दणाणून सोडले. वर्षभरानंतर रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्ह्यातील दुष्काळ, पाणी टंचाईसह कुठल्याच महत्त्वाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखविली नाही. किंबहुना सेना- भाजपाचे खासदार, आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने पूर्व नियोजनाद्वारेच सभा गुंडाळल्याचा आरोप आमदारदारांनी केला. ( व्हिडीओ - मनिष तसरे )