युवा दिन, युवा सप्ताह उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST2021-01-21T04:36:41+5:302021-01-21T04:36:41+5:30

वाशिम : क्रीडा युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जानेवारी रोजी युवा ...

Youth Day, Youth Week in excitement | युवा दिन, युवा सप्ताह उत्साहात

युवा दिन, युवा सप्ताह उत्साहात

वाशिम : क्रीडा युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जानेवारी रोजी युवा दिन तसेच दिनांक १२ ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत युवा सप्ताह आयोजित करण्यात आला होता.

दिनांक १२ जानेवारी रोजी कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीदिनी युवा सप्ताहाला सुरूवात झाली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकलगावच्या सरपंच पार्वतीबाई काळबांडे होत्या तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चक्रधर गोटे उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, लेखाधिकारी बी. एन. काळबांडे, जिल्हा संघटक राजेश गावंडे, प्राचार्य बाळासाहेब गोटे, वसंतराव अवचार, प्रा. भारत आव्हाळे, प्रा. योगेश्वर निकस, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष देविदास काळबांडे, पोलीसपाटील जनक काळबांडे, संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र काळबांडे, माजी मुख्याध्यापक भानुदास चव्हाण, नारायण काळबांडे, डॉ. दीपक ढोले, शेषराव काळबांडे, दत्ताराव काळबांडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी यांनी केले तर संतोष सरोदे यांनी आभार मानले.

युवा सप्ताहादरम्यान निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, यशस्वी व्यक्तींचे अनुभव कथन तसेच रोजगार व स्वयंरोजगाराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या सप्ताहादरम्यान विविध उपक्रम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय स्तरावर आयोजत करण्यात आले होते. दिनांक १९ जानेवारी रोजी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये या सप्ताहाचा समारोप करण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Web Title: Youth Day, Youth Week in excitement