शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत उपकेंद्रांची कामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

........... महामार्ग पोलीस केंद्राकडून वाहनचालकांचे प्रबोधन वाशिम : अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून सोमवार, ६ सप्टेंबर ...

...........

महामार्ग पोलीस केंद्राकडून वाहनचालकांचे प्रबोधन

वाशिम : अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून सोमवार, ६ सप्टेंबर रोजी महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या चालकांचे प्रबोधन करण्यात आले. अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसह वाहन चालकांनी प्रवासादरम्यान मद्य प्राशन करू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक नितीन दांदडे यांनी केले.

.............

समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमांतर्गत शिबिर

वाशिम : समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमांतर्गत मंगरूळपीर तालुक्यातील गावांमध्ये मार्गदर्शन शिबिर घेणे सुरू आहे. या माध्यमातून गावकरी व शेतकऱ्यांना जलव्यवस्थापन, मृदा संवर्धन, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची शास्त्रशुद्ध पद्धत यांसह इतरही महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

..............

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक

वाशिम : शहरातील काही उत्साही युवकांनी नव्या वर्षांत १ जानेवारी २०२१पासून वर्षभर ‘३६५ दिवस शिवजलाभिषेक सोहळा’ हा उपक्रम हाती घेतला. याअंतर्गत येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास सोमवारी सकाळी जलाभिषेक करण्यात आला. यावेळी शहरातील युवकांची उपस्थिती होती.

............

मेडशी वळण रस्त्यावर फलकाचा अभाव

वाशिम : वाशिम ते अकोला मार्गावर असलेल्या मेडशी गावानजीक वळण रस्ता आहे. याठिकाणी समोरून येणारे वाहन सहजासहजी दृष्टीस पडत नाही. यामुळे किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एखादवेळी मोठा अपघातही घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, वळण रस्त्यावर दोन्ही बाजूंनी फलक लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

..............

जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेची मागणी

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना आजही पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. यासह रुग्ण भरती ठेवल्या जाणाऱ्या वार्डांसमोर घाण पसरलेली असते. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता केली जात नाही. एकूणच या सर्व बाबींकडे लक्ष पुरवून स्वच्छता राखण्यात यावी, अशी मागणी आकाश मुळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केलेल्या निवेदनात केली.