शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

महिलांनी घेतली महिलांवरील हिंसाचार रोखण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 3:23 PM

महिलांनीच महिलांवरील हिंसाचार रोखण्याची शपथ घेऊन अन्यायाविरूद्ध लढा पुकारण्याचा निर्धार केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस’ या सामाजिक संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांसाठी ३ व ४ नोव्हेंबर या कालावधीत दोन दिवसीय महिला नेतृत्व विकास कार्यशाळा घेण्यात आली. त्यात महिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या कार्यशाळेत महिलांनीच महिलांवरील हिंसाचार रोखण्याची शपथ घेऊन अन्यायाविरूद्ध लढा पुकारण्याचा निर्धार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झालेल्या या कार्यशाळेला नागपूर खंडपिठाचे अ‍ॅड. डॉ. मोहन गवई, विधी महाविद्यालय, औैरंगाबादचे माजी अध्यापक अ‍ॅड. हिरामन मोरे, अ‍ॅड. दिपाली सांबर, अ‍ॅड. संगीता गायकवाड, अ‍ॅड. आर.एन. कांबळे, डॉ. एम.बी. डाखोरे, एनडीएमजेचे मराठवाडा अध्यक्ष जगदीप दिपके, हिंगोली जिल्हा सचिव दलित दिपके, अब्दुल हाफीज, राज्य सहसचिव पी.एस. खंदारे यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.यावेळी उपस्थित प्रशिक्षाणार्थी महिलांनी प्रशिक्षणाचा वृतांत प्रभावीपणे मांडला. उच्च न्यायालय औरंगाबादचे अ‍ॅड. सिद्धार्थ ऊबाळे व पी.एस. खंदारे यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पास्को) या विषयावर, तर जिल्हा व सत्र न्यायालय, बुलडाणाच्या विधिज्ञ अ‍ॅड. ऋचिता जाधव, एनडीएमजे विदर्भ विभागीय सचिव भारत गवई  यांनी कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार व अश्लिलता विरोधी कायदा या विषयावर आणि सेवानिवृत्त नियोजन अधिकारी डॉ. डाखोरे व कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिकारी बी.बी. धनगर यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा यावर मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी महिला नेतृत्व विकास कार्यशाळेसंदर्भात मौलिक माहिती दिली. यावेळी महिलांवर हिंसाचार होणार नाही, या आशयाची सामुहिक शपथ घेऊन दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक