शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगेट बंद असताना इतकी घाई कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST

वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातून पूर्वीप्रमाणे रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. शहरात उड्डाणपुलाचे काम वेगात सुरु आहे. ...

वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातून पूर्वीप्रमाणे रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. शहरात उड्डाणपुलाचे काम वेगात सुरु आहे. काही महिन्यांत पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगेटचा विषय राहणार नाही. परंतु सद्यस्थितीत रेल्वेगेट बंद असतांना काही दुचाकीस्वार जीवघेणी कसरत करताना लाेकमतने केलेल्या पाहणीत दिसून आले. नेमकी इतकी घाई कशासाठी, हे कळायला मार्ग दिसून येत नाही.

वाशिम शहरामध्ये सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान, दुपारी दाेनदा व संध्याकाळी ६ ते ६.३० वाजताच्या दरम्यान रेल्वेच्या वेळेवर गेट बंद केले जात आहे. सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने वाहतूक माेठ्या प्रमाणात प्रभावित हाेत आहे. गेट बंद झाल्यानंतर काही वाहनचालक गेटखालून आपली माेटारसायकल काढून कसरत करीत असल्याचे ९ सप्टेंबर राेजी दिसून आले. यासंदर्भात एवढी घाई कशासाठी, अशी विचारणा केली असता अर्जंट काम असल्याचे सांगितले, तर काहींनी चक्क तुम्हाला काही अडचण आहे का? असा उलट प्रश्न सुध्दा केला. या ठिकाणी रेल्वेच्या वेळेवर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त केल्यास ही समस्या सुटू शकते याकडे पाेलीस विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. इतर वेळी पाेलीस कर्मचारी येथे दिसून येतात. परंतु गुरुवारी पाेलीस कर्मचारी दिसून आले नाहीत.

शहर वाहतूक शाखा निरीक्षक म्हणतात....

रेल्वेगाड्याच्या वेळी येथे नेहमीच वाहतूक विस्कळीत हाेत असल्याने शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असतात. अनेकदा रेल्वे गेट बंद असताना काही वाहनचालक जीवघेणी कसरत करीत असताना आढळून आल्यानंतर त्यांना दमसुद्धा भरला. अनेकांना कागदपत्रे नाहीत म्हणून दंडसुद्धा केला आहे. वारंवार सांगूनही काही लाेक हा प्रकार करीत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेच्या वेळी हाेत असलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियमित कर्मचारी नियुक्त केल्या जाईल.

नागेश माेहाेड

शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम

रेल्वेगेट बंद केल्यानंतर तेथे रेल्वेतील कर्मचारी ठेवण्यात यावा. यामुळे जीवघेणी कसरत करीत असलेल्या वाहनचालकांना राेख बसेल. वाहनचालकांनीसुध्दा नियम पाळणे गरजेचे आहे.

- निलेश चव्हाण, वाशिम

रेल्वेगेट बंद असताना नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे. आपले कुटुंब आपली घरी वाट पाहतेय याचे भान ठेवणे गरजेचे आहे. अचानक दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वीरेंद्र वाटाणे, वाशिम

मी नेहमीच या मार्गावरून ये जा करताे. बऱ्याचदा रेल्वेगेट बंद असले की रेल्वे जाईपर्यंत वाट पाहताे. आता तर रेल्वेची वेळ माहीत असल्याने या वेळी माझे काम उरकून घेऊन मग निघताे. परंतु कधीच नियमांचे उल्लंघन केले नाही.

बाळूभाऊ भाेयर, वाशिम

रेल्वेगेट बंद असताना गेटच्या खालून काेणी जात असेल तर त्याला ऑन द स्पाॅट दंड करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे. त्याशिवाय हा प्रकार थांबणे शक्य नसल्याचे दिसून येते. कठाेर पावले उचलणे गरजेचे आहे.

अमाेल वाटाणे, वाशिम

शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेगेट बंद हाेत असल्यापासून तर ते उघडेपर्यंत येथे थांबावे. जेणेकरुन काेणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही. तसेच नागरिकांनीसुध्दा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

विशाल अग्रवाल, वाशिम