पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला  वाशिमचा आरोपी पुण्यात जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:37 PM2018-02-20T18:37:23+5:302018-02-20T18:38:39+5:30

वाशिम : मित्राच्या सहाय्याने पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी जेरबंद करण्यास वाशिम शहर डी.बी. पथकास अखेर तीन महिन्यानंतर यश मिळाले. गणेश बांगर असे नाव असलेल्या या आरोपीस १८ फेब्रुवारीला पुणे येथील चाकण परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी २० फेब्रुवारीला दिली.

Wasim escaped from police custody! | पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला  वाशिमचा आरोपी पुण्यात जेरबंद!

पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला  वाशिमचा आरोपी पुण्यात जेरबंद!

Next
ठळक मुद्देपोलिसांची नजर चुकवून आरोपी गणेश बांगर याने दिलीप हरकळची मोटारसायकल घेवून पळ काढला होता. १८ फेब्रुवारी २०१८ रोजी वाशिम शहर डी.बी. पथकास माहिती मिळाली की गणेश बांगर हा पुणे येथे वास्तव्य करित आहे.त्यावरून विशेष पथकाने पुणे येथे शोध घेतला असता, गणेश हा चाकण परिसरात आढळून आला. तेथून त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे.


वाशिम : मित्राच्या सहाय्याने पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी जेरबंद करण्यास वाशिम शहर डी.बी. पथकास अखेर तीन महिन्यानंतर यश मिळाले. गणेश बांगर असे नाव असलेल्या या आरोपीस १८ फेब्रुवारीला पुणे येथील चाकण परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी २० फेब्रुवारीला दिली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, की एका गुन्ह्यात आरोपी गणेश बांगर यास पोलिसांनी २४ नोव्हेंबर २०१७ रोजी बार्शिटाकळी (जि.अकोला) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांच्या कोर्टात हजर केले होते. तेथून परत वाशिमला आणल्यानंतर गणेशचा मित्र दिलीप दिनकर हरकळ हा जिल्हा कारागृहानजिक आरोपीस भेटण्यासाठी आला. जमानतीबाबत बोलायचे आहे, असे सांगून ते दोघे बोलू लागले. यादरम्यान पोलिसांची नजर चुकवून आरोपी गणेश बांगर याने दिलीप हरकळची मोटारसायकल घेवून पळ काढला. याप्रकरणी वाशिम पोलिसांनी आरोपी बांगरसह त्यास मदत करणाºया गणेश हरकळविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. 
१८ फेब्रुवारी २०१८ रोजी वाशिम शहर डी.बी. पथकास माहिती मिळाली की गणेश बांगर हा पुणे येथे वास्तव्य करित आहे. त्यावरून विशेष पथकाने पुणे येथे शोध घेतला असता, गणेश हा चाकण परिसरात आढळून आला. तेथून त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कार्यवाही वाशिम शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बी.डी. अवचार, राजेश बायस्कर, रमेश तायडे, प्रशांत अंभोरे, ज्ञानदेव मात्रे, गजानन कराळे, गणेश बर्गे, दीपक घुगे यांनी पार पाडली.

Web Title: Wasim escaped from police custody!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.