वाशिम तालुक्यात -- टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST2021-01-16T04:45:05+5:302021-01-16T04:45:05+5:30

तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहागीर, वारा जहागीर, अनसिंग, ...

In Washim taluka - percent voting | वाशिम तालुक्यात -- टक्के मतदान

वाशिम तालुक्यात -- टक्के मतदान

तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहागीर, वारा जहागीर, अनसिंग, ब्रह्मा, किनखेडा, पिंपळगाव, तोरणाळा, वारला, अडोळी, टो, काटा, पार्डी टकमोर, तोंडगाव, भोयता, उकळीपेन, कोंडाळा झामरे, पार्डी आसरा, सावरगाव जिरे, काजळंबा. या गावातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान संपला होता. तथापि, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करून प्रशासकांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली होती. दरम्यान, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात वाशिम तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने, तर उर्वरित १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. निर्धारित वेळेनुसार सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. वृत्त लिहिस्तोवर -- टक्के मतदानाची नोंद झाली होती.

------------

पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

वाशिम तालुक्यात १९ ग्रामपंचायतींची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी १९ ग्रामपंचायतींमधील प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्डची प्रत्येक केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती. मतदान केंद्रांवरील पोलिसांचा बंदोबस्त आणि प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी प्रत्येक मतदान केंद्राला भेट दिली.

Web Title: In Washim taluka - percent voting