शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांनंतर वाशिम जिल्ह्यात पाऊस!

By admin | Updated: September 1, 2016 02:02 IST

बळीराजा सुखावला; खरिपाच्या पिकांना मिळाले जीवदान.

वाशिम, दि. ३१ : गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजतापासून जिल्हय़ातील अनेक भागात जोरदार पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला पाऊस आल्याने बळीराजा सुखावला आहे.जिल्हय़ात काही ठिकाणी ८ ते १0, तर काही ठिकाणी १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली होती, तर काही ठिकाणी पावसाअभावी पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली होती. अनेक भागात शे तकर्‍यांनी देवाकडे सुद्धा साकडे घातले. महाप्रसाद कार्यक्रमांचे आयोजन केले. अखेर ३१ ऑगस्ट रोजी दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शे तकर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले.जिल्ह्यात यंदा चार लाखांहून अधिक हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, तूर, मुग, उडीद, हळद आदी िपकांचा समावेश असून, सर्वाधिक पेरा पुन्हा एकदा सोयाबीनचाच आहे. यंदा पावसाने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांची पेरणी जुलै महिन्याच्या पूर्वार्धातच आटोपली. त्यानंतरच्या पावसामुळे पिकांची स्थिती जोमदार झाल्याने. पिकांप्रमाणेच शेतकर्‍यांचे चेहरेही हिरवेगार दिसू लागले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंंंत पीक परिस्थिती बरी होती. परंतु पावसाने गत १५ ते २0 दिवसांपासून दडी मारल्याने माळरानावरील पिके सुकू लागली होती. गत आठवड्यात तर चांगल्या दर्जाच्या जमिनीवरील पिकांनादेखील धोका पोहोचू लागला होता. गत तीन वर्षांंंपासून निसर्गाने साथ न दिल्याने शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पादन घेता आले नाही. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस असल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. बुधवारी दुपारनंतर पावसाने जिल्हाभरात सार्वत्रिक हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली. मंगळवारी रात्रीदरम्यान जिल्ह्यात सरासरी ११.४0 मिमी पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे हातातून जाणार्‍या िपकांना जीवदान मिळाले. वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, साखरा, कळंबा, तोंडगाव, तोरणाळा, अनसिंग, शेंदुरजना, नागठाणा, रिसोड, शिरपूर यासह ग्रामीण भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वच जण सुखावले आहेत.