शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : १७ उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 14:50 IST

४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख उमेदवारांसह अपक्षांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ आॅक्टोबरपर्यंत १७ उमेदवारांनी २५ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केले आहेत. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवारांनी आठ अर्ज, वाशिममध्ये तीन उमेदवारांनी तीन अर्ज आणि कारंजा मतदारसंघात ८ उमेदवारांच्या १४ अर्जांचा समावेश आहे. दरम्यान, ४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख उमेदवारांसह अपक्षांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या सातव्या दिवशी अर्थात ३ आॅक्टोबर रोजी रिसोड विधानसभा मतदारसंघातून सोनाली प्रकाश साबळे (अपक्ष), महादेव पांडुरंग मुसळे (अपक्ष), तसव्वरखॉ गुलाम गौसखॉ (एमआयएम), प्रशांत गावंडे (संभाजी ब्रिगेड पार्टी), दिलीप रामभाऊ जाधव (वंचित बहुजन आघाडी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी या मतदारसंघातून प्रशांत विष्णू बकाल (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.कारंजा विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटणी (भाजपा), चंद्रकांत ठाकरे (राकाँ/अपक्ष), युसूफ पुंजानी (बसपा/अपक्ष), अण्णासाहेब शेंडगे (अपक्ष), डिगांबर चव्हाण (अपक्ष), मनिष मोडक (प्रहार जनशक्ती), माणिक पावडे (संभाजी ब्रिगेड) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी येथे मुरलीधर पवार (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केला होता. वाशिम विधानसभा मतदारसंघातून आमदार लखन मलिक (भाजप), सुरेश प्रकाश राजगुरू (अपक्ष), भागवत रणबावळे (अपक्ष) अशा उमेदवारांनी अर्ज दाखल केला.दरम्यान, ३ आॅक्टोबरपर्यंत तिनही विधानसभा मतदारसंघातून २५२ उमेदवारांनी ३०४ उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघातून ४७ उमेदवारांनी ९० अर्ज, वाशिम मतदारसंघातून ६१ उमेदवारांनी ७० अर्ज आणि कारंजा मतदारसंघातून सर्वाधिक १४४ उमेदवारांच्या १४४ अर्जांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019