सुकळी येथील अवैध दारू बंदीसाठी ग्रामस्थांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:57+5:302021-09-10T04:49:57+5:30

ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले की, ग्राम सुकळी गावात मोठ्या प्रमाणत अवैध दारू विकल्या ...

Villagers strike for illegal liquor ban in Sukli | सुकळी येथील अवैध दारू बंदीसाठी ग्रामस्थांची धडक

सुकळी येथील अवैध दारू बंदीसाठी ग्रामस्थांची धडक

ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले की, ग्राम सुकळी गावात मोठ्या प्रमाणत अवैध दारू विकल्या जात आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने गावातील दारू विक्रेते ग्राम पंचायत सरपंच व पदाधिकारी यांना जुमानत नाही. त्यामुळे गावात दारू विक्रीचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार गावातील महिला यांनी ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे दिली. त्यामुळे गावातील अवैध दारू त्वरित बंद करावी, अश्या मागणीचे निवेदन सुकळी सरपंच नागेश पाटील व वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सरपंच नागेश पाटील व वंचित बहुजन आघाडीचे कारंजा तालुका पदाधिकारी किशोर उके, दिलीप रोकडे, रवी भुसारे, रंगराव गोपनारायण, गणेश मस्के, देवानंद डोंगरदिवे, विलास डोंगरे तसेच सुकळी गावातील तुकाराम पाटील, ग्रामसेवक नरेश गजभिये, नितीन भा. चैाधरी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सरलाताई वानखेडे, पोलीस पाटील व ग्रा.पं. सदस्य दीपक हिंगणकार,

निरूर्ती

वानखेडे, सखाराम वानखेडे, प्रवीण चैधरी, सुनिता कोल्हे, नितीन की. चैाधरी व गावातील इतर महिलांची उपस्थिती होती.

Web Title: Villagers strike for illegal liquor ban in Sukli