गोसावी समाज मंडळातर्फे विविध कार्यक्रम

By Admin | Updated: August 20, 2014 23:01 IST2014-08-20T23:01:05+5:302014-08-20T23:01:05+5:30

भारतरत्न व्ही.व्ही.गिरी यांची जयंती व सत्कार कार्यक्रम पार पडला.

Various programs by Gosavi Samaj Mandal | गोसावी समाज मंडळातर्फे विविध कार्यक्रम

गोसावी समाज मंडळातर्फे विविध कार्यक्रम

कारंजालाड : गोसावी समाज मंडळातर्फे येथे भारतरत्न व्ही.व्ही.गिरी यांची जयंती व सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष संतोष गिरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोसावी समाजाचे वाशिम जिल्हाध्यक्ष मंगल गिरी व वाशिम तालुकाध्यक्ष दशरथ गिरी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी समाजाचे दैवत भगवान शंकर व राष्ट्रपती गिरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ऋचा गिरी हिने स्वागतगीत सादर केले. या प्रसंगी प्रल्हाद भारती यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. गोसावी समाजाचे संघटन मजबूत करावे असे आवाहन संतोष गिरी यांनी केले. प्रास्ताविक मंडळाचे सचिव नारायण गिरी तर सूत्रसंचालन ऋचा गिरी यांनी केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष रवींद्र गिरी, सहसचिव रवि गिरी, सदस्य अंबादास गिरी, प्रल्हाद भारती, कैलास गिरी, ज्योती भारती, धनराज पुरी, अभिजीत भारती यांनी सहकार्य केले.

Web Title: Various programs by Gosavi Samaj Mandal