उडीद व मुगाची आवक वाढली!

By Admin | Updated: September 30, 2015 01:25 IST2015-09-30T01:25:47+5:302015-09-30T01:25:47+5:30

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद व मूग या धान्याची आवक वाढली; उडिदाचे भाव ११ हजारांवर.

Urad and Mugha's arrivals increased! | उडीद व मुगाची आवक वाढली!

उडीद व मुगाची आवक वाढली!

कारंजा लाड (जि. वाशिम ) : रोख व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद व मूग या धान्याची आवक वाढली आहे. २९ सप्टेंबर रोजी उडिदाची ७५0 क्विंटल तर मुगाची ३१0 क्विंटल आवक झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून शेतीतील पिकांचे उत्पन्न घटले असून, बाजारपेठेत मरगळ आली आहे. यावर्षीही पिकांच्या गरजेप्रमाणे पाऊस बरसला नाही. त्यामुळे सोयाबीन पीक हातचे गेले. पण उडीद आणि मुगाचे पीक थोड्या फार प्रमाणात साधले. सद्यस्थितीत नवीन मूग व उडीद पीक शेतकर्‍यांच्या घरात आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कमी उत्पन्न झाल्याने शेतकर्‍यांना पैशाची चणचण भासत आहे. त्यामुळे यावर्षीचे नवीन पीक घरात येताच, हे पीक विकण्यासाठी शेतकरी बाजार समितीत येत आहेत. शेतकर्‍यांच्या मालाला उच्चतम भाव मिळत असल्याने बाजार समितीत मालाची आवक वाढलेली दिसून येते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव नीलेश भाकरे यांनी दिली.

Web Title: Urad and Mugha's arrivals increased!