शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचे सरपंच माने यांच्याविरुध्द अविश्‍वास

By admin | Updated: November 12, 2014 23:24 IST

१३ सदस्यांनी दाखल केला प्रस्ताव.

वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या भाजप सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले असले तरी, जिल्ह्यातील भाजप नेते डॉ. विवेक माने यांचे मालेगाव ग्रामपंचायत मधील सरकार अल्पमतात आले आहे. ग्रामपंचायतीच्या तब्बल १३ सदस्यी त्यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे जिल्ह्या तील राजकारणात कमालीची खळबळ उडाली आहे. गत काही दिवसांपासून मालेगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. सरपंच माने व काही सदस्यांमध्ये कुरबुर होत असल्याची चर्चा शहरभर होती. अखेर सरपंच डॉ.माने यांच्या विरुध्द ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांनी १२ नोव्हेंबर रोजी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. सदस्यांना विश्‍वासात घेवून काम करीत नाही तसेच गावा तील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. या कारणावरुन हा अविश्‍वास प्रस्ताव दाखल कण्यात आला. मालेगावचे तहसीलदार विघाते यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी ५ दिवसानंतर म्हणजे १७ नोव्हेंबरला बहुमत सिध्द करण्यासाठी विशेष सभा बोलाविली आहे. ११ नोव्हेंबर २0११ मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपण्याला अद्याप २ शिल्लक आहेत. तर दुसरीकडे मालेगाव नगर पंचायतीची घोषणा झाली आहे. त्याचे नोटीफीकेशन कोणत्याही क्षणी निघु शकते त्यामुळे हे प्रकरण आता काय वळण घेवू शकते. याकडे मालेगाव वासीयांचे लक्ष लागून आहे. आता सर्व १३ सदस्य अज्ञातस्थळी गेले आहेत. दरम्यान माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याची प्रतिक्रीया सरपंच डॉ. विवेक माने यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.