शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोघांचा जणांचा मृत्यू; ३८६ कोरोना पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू तर ३८६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २० एप्रिल ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू तर ३८६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २० एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २३०४९ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार आणखी दोन जणांचा मृत्यू झाला तर ३८६ जणांना कोरोना संसर्ग झाला. वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, आनंदवाडी येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, चांडक ले-आऊट येथील ४, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील ९, ड्रीमलँड सिटी येथील १, गणेश नगर येथील १, गव्हाणकर नगर येथील १, गोंदेश्वर येथील १, आययूडीपी कॉलनी येथील ३, नवोदय विद्यालय परिसरातील १, काळे फाईल येथील २, लाखाळा येथील १०, मन्नासिंग चौक येथील १, मंत्री पार्क येथील १, नालंदा नगर येथील १, नवीन आययूडीपी कॉलनी येथील १, निमजगा येथील १, पंचायत समिती परिसरातील १, पाटणी चौक येथील ६, पुसद नाका येथील १, रमेश टॉकीज जवळील १, रिसोड नाका येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १०, समर्थ नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, योजना कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील १, रेल्वे स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ३, असोला येथील २, ब्रह्मा येथील १, फाळेगाव येथील १, हिवरा रोहिला येथील १, इलखी येथील १, काटा येथील २, खंडाळा येथील १, किनखेडा येथील १, मसला येथील १, मोहजा येथील २, पार्डी आसरा येथील १, सावरगाव येथील १, सावंगा येथील १, सावरगाव बर्डे येथील ५, शेलू बु. येथील १, शेलू खु. येथील १, सोनखास येथील २, तोंडगाव येथील ६, विळेगाव येथील १, वांगी येथील १, अजगाव येथील १, मालेगाव शहरातील ४, आमखेडा येथील २, दापुरी कॅम्प येथील ७, ढोरखेडा येथील २, दुबळवेल येथील १, गौरखेडा येथील २, जऊळका येथील २, मुठ्ठा येथील १, शिरपूर येथील ९, वरदरी येथील १, जऊळका कॅम्प येथील ५, किन्हीराजा येथील १, समृद्धी कॅम्प येथील १, रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, आसन गल्ली येथील १, बेंदरवाडी येथील १, धनगर गल्ली येथील १, जिजाऊ नगर येथील १, महानंदा नगर येथील २, रामकृष्ण नगर येथील १, राेहिदास नगर येथील १, साई ग्रीन पार्क कॉलनी येथील १, एकता नगर येथील १, लोणी रोड येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १२, आसेगाव पेन येथील १, बेलखेडा येथील ३, भोकरखेडा येथील २, बिबखेडा येथील १, देगाव येथील १, घोन्सर येथील २, गोभणी येथील २, गोवर्धन येथील ५०, हराळ येथील २, जांब येथील ६, जोडगव्हाण येथील १, करडा येथील १, केनवड येथील ७, खडकी येथील १, कोयाळी येथील २, मिर्झापूर येथील १, निजामपूर येथील १, रिठद येथील ८, शेलगाव येथील १, वनोजा येथील ६, येवती येथील १, व्याड येथील १, वाकद येथील १, मोप येथील १, नंधाना येथील २, मंगरूळपीर शहरातील लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, मध्यवर्ती बँक परिसरातील १, मंगलधाम येथील २, चारभूजा मंदिर परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, नवीन आठवडी बाजार परिसरातील २, चोरद येथील १, धानोरा येथील १, धोत्रा येथील १, कळंबा येथील १, कवठळ येथील ६, खडी येथील १, कुंभी येथील १, मानोली येथील १, मोझरी येथील २, पिंपळखुटा येथील २, शेंदूरजना येथील १, सोमठाणा येथील १, सोनखास येथील २, वरुड येथील १, घोटा येथील २, दाभा येथील २, माळशेलू येथील १, वनोजा येथील १, कारंजा शहरातील बाबरे कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, भीमनगर येथील १, लोकमान्य नगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील ६, शिवाजी नगर येथील १, तुळजा भवानी नगर येथील २, आखतवाडा येथील १, भडशिवणी येथील १, दापुरा येथील १, धामणी येथील १, गायवळ येथील १, काजळेश्वर येथील ९, कामठवाडा येथील १, खानापूर येथील १, खेर्डा बु. येथील ३, किनखेड येथील १, कुपटा येथील १, पारवा कोहर येथील १, शेलुवाडा येथील १, शिवणी येथील १, तुळजापूर येथील १, उंबर्डा बाजार येथील १, माळेगाव येथील ४, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १, तळप येथील १, वटफळ येथील १, हिवरा खु. येथील २, कारखेडा येथील १, कोंडोली येथील १, ढोणी येथील २, पाळोदी येथील १, असोला खु. येथील १, शेंदोना येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १७ बाधितांची नोंद झाली असून ४१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

0000000000000000

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह २३,०४९

ॲक्टिव्ह ४,१२७

डिस्चार्ज १८,६८३

मृत्यू २३८