आणखी दोन कोरोनामुक्त; दोन पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST2021-09-08T04:49:25+5:302021-09-08T04:49:25+5:30

जिल्ह्यात पहिल्या लाटेत कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित झाले होते. जून ...

Two more corona-free; Two positives! | आणखी दोन कोरोनामुक्त; दोन पॉझिटिव्ह!

आणखी दोन कोरोनामुक्त; दोन पॉझिटिव्ह!

जिल्ह्यात पहिल्या लाटेत कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित झाले होते. जून महिन्यापासून कोरोनाची लाट ओसरत असून, रुग्णसंख्यादेखील एका अंकात येत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. मंगळवारी नव्याने दोन रुग्ण आढळले, तर दोनजणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७२६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

१५ सक्रिय रुग्ण

मंगळवारच्या अहवालानुसार नवीन दोन रुग्ण आढळून आले, तर दोघांनी कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात १५ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

.....

पाच तालुके निरंक

मंगळवारच्या अहवालानुसार कारंजा तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले. उर्वरित वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही.

Web Title: Two more corona-free; Two positives!