शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : दुकाने बंद ठेवण्याबाबत व्यापारी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:31 IST

Washim Traders confused about lockdown : ‘ब्रेक दी चेन’च्या नियमावलीबाबत जिल्हाभरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य सरकारने लागू केलेल्या ‘ब्रेक दी चेन’च्या नियमावलीबाबत जिल्हाभरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, आज पहिल्या दिवशी सकाळी नित्यनेमानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली; मात्र काहीच वेळात पोलीस प्रशासन, न.प., ग्रा.पं.च्या पथकाने येऊन दुकाने बंद करायला लावली. यामुळे व्यापाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त झाला.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत सध्या हा आकडा १७ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे १ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत ३४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाची ही साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुषंगाने ५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व स्वरूपातील दुकाने, प्रतिष्ठाने, आस`थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक सोमवारपासून शुक्रवारपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरता येणार नाही किंवा एकत्र जमता येणार नाही. अत्यावश्यक सेवा सकाळी ७ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतीलत्यात अन्नधान्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्री, दूध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने, रेल्वे, टॅक्सी, आॅटो आणि बसेस सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. माल वाहतूक, शेतीसंबंधीच्या सेवा, अधिकृत मिडीया, पेट्रोलपंप, शासकीय व खाजगी सेक्युरिटी सर्व्हीस सुरू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आदेशात नमूद केले आहे. 

गतवर्षी अनेक दिवस दुकाने बंद राहिल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले; मात्र प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी कोरोना चाचण्या करून घेतल्या. असे असताना चेन दी ब्रेकच्या नावाखाली लाॅकडाऊन लावून व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. व्यापाऱ्यांची मानसिकता नसल्याने प्रशासनाने फेरविचार करायला हवा.- आनंद चरखा, अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम 

टॅग्स :washimवाशिम