शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आजपासून वाढ

By admin | Updated: March 14, 2015 01:37 IST

मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय.

अकोला : मध्य रेल्वे मार्गावर दररोज अकोलामार्गे धावणार्‍या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये १४ मार्चपासून वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दररोज १३४६ कि.मी. अंतर कापणार्‍या या गाडीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय बुधवारी घेतला. मध्य रेल्वे प्रशासनाने १९९२ मध्ये सुरू केलेल्या या गाडीमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. वेटिंगमुळे तिकीट रद्द करणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा आर्थिक फटका रेल्वेला सहन करावा लागत होता. सुपरफास्टचा अधिभार लागत नसल्याने या गाडीला प्रवाशांची कायम गर्दी राहते. वेटिंगवर राहणार्‍या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन या गाडीला शनिवारपासून आणखी एक स्लीपर क्लास डबा कायमस्वरूपी जोडणार आहे. ५५ कि.मी. प्रतितास या गतीने धावणार्‍या महाराष्ट्र एक्स्प्रेसला यापुढे एक द्वितीय श्रेणी वातानुकूल, एक तृतीय श्रेणी वातानुकूल, ९ स्लीपर आणि ५ सामान्य डबे असे १६ डबे राहणार आहेत.