शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देगाव शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची दैनंदिन तीनवेळा आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:48 IST

Washim News रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाच्या पथकाकडून दिवसातून तीन वेळा आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेला भेट देवून आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील २२९ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक शाळेत तैनात केले होते. त्याचबरोबर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोग्य विभागाने तातडीने या सूचनांची अंमलबजावणी करून या शाळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या शाळेचे तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. येथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा शाळेला भेट दिली. तसेच सद्य:स्थिती जाणून घेतली.

व्हिडिओ कॉलिंगद्वारे विद्यार्थ्यांचा पालकांशी संवादबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १, हिंगोली जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्हा प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क करून दिला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या