वाशिम जिल्ह्यात २९ मार्चपासून तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:46 PM2018-03-28T13:46:28+5:302018-03-28T13:46:28+5:30

वाशिम - वाशिम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने जूनी जिल्हा परिषद परिसर, अकोला नाका वाशिम येथे २९ ते ३१ मार्च या दरम्यान तीन दिवशी महिला बचत गटाच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Three day district level exhibition and sale rally in Washim district from March 29! | वाशिम जिल्ह्यात २९ मार्चपासून तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळावा !

वाशिम जिल्ह्यात २९ मार्चपासून तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळावा !

Next
ठळक मुद्देमहिला बचत गट तसेच अन्य बचत गटाने उत्पादित केलेल्या विविध वस्तू व साहित्यांचे स्टॉल लावले जाणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख राहणार आहेत. प्रदर्शन व मेळाव्याच्या यशस्वितेसाठी कामांची विभागणी म्हणून विविध समित्यांचे गठण केले आहे.

वाशिम - वाशिम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने जूनी जिल्हा परिषद परिसर, अकोला नाका वाशिम येथे २९ ते ३१ मार्च या दरम्यान तीन दिवशी महिला बचत गटाच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन व मेळाव्याच्या यशस्वितेसाठी कामांची विभागणी म्हणून विविध समित्यांचे गठण केले आहे.

बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व मालाला बाजारपेठ मिळावी, उत्कृष्ट कार्य करणाºयांच्या पाठिवर कौतुकाची थाप तसेच इतरांना प्रेरणा मिळावी, या दृष्टिकोनातून सदर प्रदर्शन व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला बचत गट तसेच अन्य बचत गटाने उत्पादित केलेल्या विविध वस्तू व साहित्यांचे स्टॉल लावले जाणार आहेत. पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख राहणार आहेत. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून ऊर्जा राज्यमंत्री तथा वाशिमचे सह पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती पानुताई जाधव, विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, यमुना जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. या प्रदर्शनी व मेळाव्याचा समारोप ३१ मार्च रोजी होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक  कुमार मीणा राहतील. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक विजय नगराळे, आर.सेटी वाशिमचे संचालक प्रदीप पाटील, नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक विजय खंदरे आदींची उपस्थिती राहणार आहे. प्रदर्शनी व मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. स्वागत, संपर्क व पत्रिका वाटप समिती, स्टॉल देखरेख समिती, नियंत्रण, नोंदणी व नियंत्रण समिती, प्रसिद्धी समिती, निवास देखरेख समिती, भोजन समिती व सांस्कृतिक समितीचे गठण करण्यात आले असून, प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदर्शनी व मेळाव्याच्या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन पाटील माने यांनी केले.

Web Title: Three day district level exhibition and sale rally in Washim district from March 29!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.