वाशिम येथे चोरीचे प्रमाण वाढले!

By Admin | Updated: May 6, 2016 02:25 IST2016-05-06T02:25:18+5:302016-05-06T02:25:18+5:30

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ५0 हजारांचा ऐवज लंपास केला.

There was a burglary at Washim! | वाशिम येथे चोरीचे प्रमाण वाढले!

वाशिम येथे चोरीचे प्रमाण वाढले!

वाशिम : शासकीय वसाहतीतील चोरीच्या घटनेला एक दिवसही उलटला नसताना हिंगोली नाका परिसरात चोरट्यांनी पुन्हा घराचे कुलूप तोडून ५0 हजारांचा ऐवज लंपास केला. दुसर्‍या एका घटनेत विठ्ठलवाडी समोरून मोटारसायकल लंपास केली. या दोन्ही घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारला फिर्याद दाखल करण्यात आली. सिव्हिल लाइन परिसरातील शासकीय वसाहतीमधील माडेवार यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी तीन लाखाचा ऐवज लंपास केला. या घटनेला २४ तास उलटले नसताना हिंगोली नाका परिसरात असलेल्या बाहेती ले-आउटमधील राजू खुशाल लोलुरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरामधील ४९ हजार ५८0 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. लोलुरे कुटुंब रविवारपासून लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. नेमका या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. दुसर्‍या एका घटनेमध्ये गजानन नवृत्ती इंगोले वाशिम येथील विठ्ठलवाडी मंगल कार्यालयामध्ये मोटारसायकल उभी करून लग्नासाठी गेले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर त्यांना उभी कलेली मोटारसायकल आढळून आली नाही. मोटारसायकलचा शहर व परिसरात शोध घेतला असता, मिळून आली नाही. या घटनेची इंगोले यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली.

Web Title: There was a burglary at Washim!