शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम आगारातून रातराणी बससेवाच नाही

By admin | Updated: May 15, 2015 23:14 IST

प्रवाशांना घ्यावी लागते खाजगी बसेसकडे धाव.

शिखरचंद बागरेचा / वाशिम : राज्य परिवहन विभागाच्या वाशिम आगारातून जिल्हय़ातील नागरिक व प्रवाशांसाठी रातनानी बससेवा सुरु केलेली नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी बसेसकडे धाव घ्यावी लागत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळय़ाची सुटी व लग्नसराईची धूम असताना रातराणी बसेसचे अभावी राज्य परिवहन महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकड खाजगी बससेवेसाठी दामदुप्पट प्रवास भाडे वसुल करुन मालकांची चांदी होत आहे. वाशिम जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर सुमारे १७ वर्षाचा दीर्घकाळ लोटला असताना मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव खांदेश, धुळे, नाशिक, सोलापूर, इंदोर, हैदराबाद, लातूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्‍वर, भिमाशंकर, बारामती, सुरत आदी प्रमुख व महत्वपूर्ण शहरांसाठी वाशिम आगाराने जून पर्यंंत एकही निमआराम किंवा साधी व रातरानी बससेवा सुरु न करणे हे एक न उलगडणारे कोडे बस प्रवाशांना पडले आहे. उन्हाळय़ाची सुटी व लग्नसराईची धूम असल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍यांची संख्या खूप वाढली असताना तसेच रेल्वेचे आरक्षण हाउस फुल्ल असताना सामान्य नागरिकांना बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद असणारी राज्य परिवहन महामंडळाची बस आपलीशी वाटते. मात्र नेमके या बाबीचा विसर पडलेल्या वाशिम आगाराने आपली उदासिनता झटकून राज्यातील प्रमुख व महत्वपूर्ण असलेल्या शहरांसाठी तातडीने रा तराणी बससेवा सुरु करण्याची गरज आहे. रातराणी बससेवा उपलब्ध नसलेले वाशिम आगार संपूर्ण राज्यात एकमेव असे आगार असल्याचा अपवाद आहे. या वाशिममार्गे सायंकाळी ७ वाजता मंगरुळपीर, पुणे रात्री १0 वाजता पांढरकवडा पुणे, रात्री १२ वाजताच्या सुमारास बुलडाणा नागपूर व शेगाव उदगीर या नंतर देगलूर अकोला या रातनाणी बसेस मागील अनेक वर्षापासून अविरत सुरु आहे. या सर्व बसेस वाशिम जिल्हाबाहेरील आगाराच्या आहेत. जिल्हा मुख्यालय असताना वाशिम आगाराची एकही रातनाणी बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसणे ही वाशिमची शोकांतिका समजावी का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.