तब्बल ८ पदे रिक्त असल्याने आराेग्य सेवेचा बट्ट्याबाेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:28+5:302021-09-04T04:49:28+5:30

जिल्ह्यातील सर्वात मोठे आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये खर्च करून आरोग्यवर्धिनी ...

As there are 8 vacancies, there is a shortage of health services | तब्बल ८ पदे रिक्त असल्याने आराेग्य सेवेचा बट्ट्याबाेळ

तब्बल ८ पदे रिक्त असल्याने आराेग्य सेवेचा बट्ट्याबाेळ

जिल्ह्यातील सर्वात मोठे आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये खर्च करून आरोग्यवर्धिनी केंद्राची नवीन इमारत बांधकाम करण्यात आले आहे. जवळपास तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या भालेराव या एकमेव कार्यरत आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत ५१ हजार लोकसंख्या लक्षात घेता, किमान येथे दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. त्यातच आरोग्य सहायक सेवानिवृत्त झाल्याने या पदासह शिरपूर भाग तीन, खंडाळा, करंजी, वसारी येथील आरोग्य सेविकेची पदे रिक्त आहेत. यासह खंडाळा व करंजी येथील आरोग्य सेवक पदही रिक्त आहे. ३३ गावांचा समावेश असलेल्या शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने याचा आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच कोरोना लसीकरण व टेस्टिंगसाठी नेमणूक केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यावर लसीकरण व टेस्टिंगची अतिरिक्त जबाबदारीही आली आहे.

करंजी व खंडाळा केंद्रातही अधिकाऱ्यांची वानवा

करंजी केंद्राअंतर्गत शेलगाव बोंदाडे, शेलगाव बगाडे, वाघळूद, वाकद, दापुरी वसाणी या गावांचा समावेश आहे. येथील आरोग्यसेवक व आरोग्यसेविका ही दोन्ही पदे रिक्त आहेत. तसेच खंडाळा उपकेंद्रअंतर्गत वाघी, कोठा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव खवणे या गावांचा समावेश आहे. येथील आरोग्यसेविका पद रिक्त आहे. सोबतच वसारी उपकेंद्रातील आरोग्यसेविका पद रिक्त आहे.

Web Title: As there are 8 vacancies, there is a shortage of health services