शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहाअभावी नाट्यकर्मींची परवड

By admin | Updated: April 1, 2017 16:45 IST

वाशिम: नाट्यक्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे कलाक्षेत्राशी निगडीत असलेले हे क्षेत्र जिल्ह्यातून हद्दपार होत असल्याचे दिसते.

वाशिम: नाट्यक्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे कलाक्षेत्राशी निगडीत असलेले हे क्षेत्र जिल्ह्यातून हद्दपार होत असल्याचे दिसते. नाट्यकर्मीेंंच्या कलेस वाव देण्यासह तरुणाईला या क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात नाट्यगृहे उभारून त्याद्वारे विविध कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक झाले आहे. चित्रपट, नाटक ही मनोरंजनाची माध्यमे तशी सर्वांनाच हवीहवीशी असतात. आजची तरुणाई तर या कला आणि नाट्यक्षेत्रात आकंठ बुडाली आहे. अभ्यास करण्याबरोबरच थोडासा विरंगुळा म्हणून अनेकांना नाट्यगृहात जावे वाटणे गैर नाही. वाशिमकर तरुणाईला मात्र नेमकी हीच उणीव जाणवत आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी नाट्य, चित्रपट व कला ही आवडीची क्षेत्रे आहेत. नवनवीन नाटके, नवे चित्रपट पाहण्याचा छंद जोपासणारे तरुण प्रेक्षक शहरात मोठ्या संख्येने आहेत; परंतु वाशिमकर मात्र त्याला पारखे राहतात. सर्व सोयीसुविधांनीयुक्त अशा नाट्यगृहांची येथे वाणवा आहे. नाट्यगृहाचा अभाव असण्यामुळे तरुण-तरुणींना कलेची आवड असतानाही उदयोन्मुख कलाकारांना नाट्यक्षेत्रात भरारी घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर येथे एक सांस्कृतिक भवन असले तरी, त्याचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले प्रयोग करणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. ----------------क्रीडासंकुलाच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात एक नाट्यगृह आणि जिल्हास्तरीय नाट्यगृह असावे. शासनाने नाट्यकर्मीसाठी या योजनेचा विचार करावा. - श्रीकांत भाके (प्रमुख कार्यवाह), अ.भा. मराठी नाट्य परिषद वाशिम