माहुली येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:39+5:302021-09-05T04:47:39+5:30

माहुली येथील विवाहित मुलींचा तीज हा सण नऊ ते दहा दिवसांचा कार्यक्रम उत्कृष्टपणे तांड्यामध्ये साजरा केला. बंजारा समाजातील पारंपरिक ...

Tej Utsav of Banjara community at Mahuli | माहुली येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव उत्साहात

माहुली येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव उत्साहात

माहुली येथील विवाहित मुलींचा तीज हा सण नऊ ते दहा दिवसांचा कार्यक्रम उत्कृष्टपणे तांड्यामध्ये साजरा केला. बंजारा समाजातील पारंपरिक पोषाखात मुली आणि महिलांनी धार्मिक गाणी गात डफड्याच्या तालावर नृत्य करत गावात मिरवणूक काढून जगदंबा माता, संत सेवालाल महाराज, हनुमान मंदिर येथे तांड्यातील नायक यांच्या हस्ते पूजा करून शांततेत तीज जवाराचे विसर्जन शांततेत करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे रूढी परंपरेनुसार बंजारा समाजातील नागरिक नायक, कारभारी, आसामी यांनी सभा घेऊन सर्वानुमते तीज जवारा कार्यक्रम घेण्याचे ठरविले होते. या उत्सवासाठी तांड्यातील गोपाल राठोड नायक, जयसिंग जाधव नायक, बदुसिंग आडे नायक, चुनीलाल राठोड नायक, हरीदास चव्हाण नायक, दिलीप जाधव नायक आणि प्रत्येक तांड्यातील कारभारी आसामी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Tej Utsav of Banjara community at Mahuli