शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

टंचाईग्रस्त गावांमधील टँकर ‘जीपीएस लोकेशन’च्या बाहेरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 16:07 IST

वाशिम : जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस ७ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध असून अन्य जलस्त्रोतही कोरडे पडत चालले आहेत.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस ७ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध असून अन्य जलस्त्रोतही कोरडे पडत चालले आहेत. यामुळे जवळपास सर्वच गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी पाणीटंचाई निवारण उपाययोजनांतर्गत १६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरविणे सुरू झाले आहे; मात्र हैद्राबाद, लातूर येथील कंत्राटदारांनी अद्याप ‘पासवर्ड’ न दिल्याने सर्वच टँकर ‘जीपीएस लोकेशन’च्या बाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यंदा राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये उद्भवलेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता, पाणीटंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाºया उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक विभागाने आदर्श आचारसंहिता शिथिल केली. यामुळे सद्या विहिर अधिग्रहण, विशेष नळ दुरूस्ती, टँकरने पाणीपुरवठा अशा सर्वच प्रकारच्या उपाययोजना तत्काळ अंमलात आणल्या गेल्या आहेत. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील बाभूळगाव, माळेगाव, अंजनखेडा, खैरखेडा, करंजी गरड, बिबखेडा, मांडवा, सनगाव, कळंबा बोडखे, धानोरा, बिटोडा भोयर, उज्वलनगर, गलमगाव, दादगाव, गिर्डा आणि धोत्रा देशमुख अशा १६ टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. यातील करंजी गरड आणि बाभूळगाव या दोन गावांमध्ये शासकीय टँकरने; तर अन्य १४ गावांमध्ये हैद्राबाद येथील मोतीलाल काबरा आणि लातूर येथील अन्नाराव संभाजी लाड नामक कंत्राटदारांचे टँकर लावण्यात आले आहेत. सर्व टँकरमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा कार्यान्वित आहे; परंतू संबंधित कंत्राटदारांनी त्याचे ‘पासवर्ड’ अद्याप दिले नसल्याने टँकरचे लोकेशन कळणे अवघड झाले आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने होत असलेल्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई