शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांकडून होणारे शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा - किशोर तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

यावेळी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उप वनसंरक्षक सुमंत ...

यावेळी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुधीर मैत्रवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तिवारी म्हणाले, वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते आणि आर्थिक गणित कोलमडते. शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करणे आवश्यक असून, जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयीचा कृती आराखडा वन विभागाने तयार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. यंदा खरीप हंगामात ९५ टक्के पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले असून, जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची परिस्थिती चांगली आहे. मात्र, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळावे, त्यांना सावकाराच्या दारात जावे लागू नये, यासाठी बँकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे तिवारी यावेळी म्हणाले.

अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना होणारे अन्नधान्य वितरण व्यवस्थितपणे होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांनासुद्धा विनाअडथळा धान्य पुरवठा करावा. अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसलेल्या नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य नियतन मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करावा, असे तिवारी यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरणाचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.

..............

पुरेसा औषधी साठा उपलब्ध ठेवा

वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून, जिल्ह्यातील बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. या कुटुंबातील व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या वैद्यकीय संस्थांमध्ये पुरेसा औषधी साठा ठेवावा. तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतील संलग्न खासगी रुग्णालयात येणाऱ्या पात्र रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य मित्रांनी रुग्णांना योग्य मार्गदर्शन करावे, असे किशोर तिवारी यावेळी म्हणाले.

..............

विषबाधा होऊ नये याची खबरदारी घ्या

जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच फवारणीमुळे विषबाधा झालेल्या व्यक्ती रुग्णालयामध्ये दाखल झाल्यास त्यांना योग्य औषधोपचार उपलब्ध करून द्यावा. अशा रुग्णांची नोंद ठेवावी. फवारणीचे काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा किट वापराबाबत व इतर आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे किशोर तिवारी यांनी यावेळी सांगितले.

पीककर्ज, अन्नसुरक्षा योजना, शेतकरी आत्महत्या, निराधार योजना अनुदान वाटप, आरोग्य सुविधा, खावटी योजना, कामगारांना अनुदान वाटप, सहकारी मजूर संस्थांचे ऑडिट, गौण खनिज वाहतूक आदी बाबींचा तिवारी यांनी यावेळी आढावा घेतला.