आरोग्य सेविकेची रेल्वेखाली आत्महत्या

By Admin | Updated: December 11, 2014 00:19 IST2014-12-11T00:19:56+5:302014-12-11T00:19:56+5:30

पुर्णा - अकोला लोहमार्गावर आत्महत्या; र्मग दाखल.

Suvarna Seva suicides under train | आरोग्य सेविकेची रेल्वेखाली आत्महत्या

आरोग्य सेविकेची रेल्वेखाली आत्महत्या

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्तव्यावर असलेल्या ४५ वर्षीय आरोग्य सेविकेने कोंडाळा झामरे (ता.जि.वाशिम) शेतशिवारात असलेल्या रेल्वे रूळावर पुर्णा - अकोला या पॅसेंजर खाली आत्महत्या केली. ही घटना आज १0 डिसेंबर रोजी दुपारी १२:३0 वाजताचे सुमारास उघडकीस आली.
किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका या पदावर असलेली प्रेमा विनोद काळणे ही महिला वाशिम येथील सिव्हील लाईन परिसरातील योजना पार्क मध्ये वास्तव्यास आहे. आत्महत्येचे कारण समजुन आले नाही. या घटनेची फिर्याद कोंडाळा झामरे येथिल पोलिस पाटील नवृत्ती किसन झामरे यांनी वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी र्मग दाखल केला असुन घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विनायक जाधव करीत आहेत.

Web Title: Suvarna Seva suicides under train