रिसोडातील बंडोबा झाले थंडोबा

By Admin | Updated: October 2, 2014 01:09 IST2014-10-02T01:09:28+5:302014-10-02T01:09:28+5:30

महायुतीमधील बंड अपेक्षितपणे शांत.

Suspended bundoba in the neighborhood | रिसोडातील बंडोबा झाले थंडोबा

रिसोडातील बंडोबा झाले थंडोबा

वाशिम: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रिसोड मतदारसंघात भारतीय जनता पक्ष- शिवसंग्राम- रिपाइं- स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीमध्ये झालेले बंड अपेक्षितपणे शांत झाले. महायुतीत हा मतदारसंघ शिवसंग्रामला सोडण्यात आल्याचे या पक्षाचे नेते सांगत होते. नव्हेतर शिवसंग्रामच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णूपंत भूतेकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज १ ऑक्टोबरला मागे घेतला. त्यामुळे येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय जाधव यांची डोकेदुखी काहीअंशी कमी झाली आहे. महायुती वगळता या मतदारसंघात अन्य कुठल्याही पक्षात बंडाळी झाली नव्हती हे विशेष. गत निवडणुकीत कॉग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीने येथील लढतीत जीव ओतला होता.

Web Title: Suspended bundoba in the neighborhood