शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

वीज समस्यांविरोधात राकाँचा मालेगाव येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 3:32 PM

मालेगाव (वाशिम) : जादा वीज भारनियमन, प्रलंबित कृषीपंप जोडणी, अनियमित वीजपुरवठा आदी  महावितरणशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव येथील शेलु फाटा येथे २६ आॅक्टोबरला दुपारी २ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : जादा वीज भारनियमन, प्रलंबित कृषीपंप जोडणी, अनियमित वीजपुरवठा आदी  महावितरणशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव येथील शेलु फाटा येथे २६ आॅक्टोबरला दुपारी २ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.  मालेगाव तालुक्यातील कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याकरीता मेडशी ३३ केव्ही उपकेंद्र येथे पुरेशा क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसविणे तसेच किन्हीराजा, शिरपूर, जऊळका रेल्वे व तालुक्यातील कृषीपंप जोडणी देण्याबाबत जे रोहीत्र मंजुर आहेत, त्याची कामे त्वरीत सुरू करावे, सर्व ठिकाणी लाईनमन देण्यात यावे, भारनियमन कमी करावे, तांत्रिक बिघाडानंतर तातडीने विद्युत रोहित्र द्यावे यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी पक्ष निरीक्षक भाष्करराव काळे, राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीपराव जाधव यांच्या नेतृत्त्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प होती. महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, मालेगावचे उपकार्यकारी अभियंता अनिल जीवनानी यांनी घटनास्थळी येऊन  भरनियमन कमी करणे, कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करणे, नादुरूस्ती विद्युत रोहित्र बदलून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी बाजार समिती उपसभापती गणपतराव गालट, नारायण शेंडगे, शेख गनीभाई, बबनराव मिटकरी, नारायण शिंदे, उल्हासराव घुगे, माजी सभापती बबनराव चोपडे, बाळासाहेब सावंत  अरुण बळी, गजानन सारस्कर, विलास रोकडे, रामेश्वर घुगे, गणेश उंडाळ, सोनू सांगळे, सतीश घुगे, राजकुमार शिंदे, गोपाल वानखेड़े, संजय दहात्रे, विष्णु पाटिल राउत, अरविंद गावडे, सुनील चंदनशिव सेवा राम आडे, अशोक  गावंडे गोपाल कुटे, वंसत कुटे, विजय गायकवाड, उल्हास राव घुगे, अक्षय गायकवाड,Þ दिगंबर खाडे, अशोक गायकवाड़, गणेश गायकवाड़, बलिराम राठोड़, शेषराव गोटे यांच्यासह राकाँ पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवNCPराष्ट्रवादी काँग्रेस