Join us  

स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 4:03 PM

स्मिता पाटील यांचा एक किस्सा जेव्हा एका स्वप्नामुळे त्यांची झोपच उडाली होती.  

अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांना आजही मराठी इंडस्ट्री असो किंवा बॉलिवूड विसरलेलं नाही. सौंदर्य, अभिनय यामध्ये त्यांचा कोणीही हात धरु शकत नव्हतं. त्यांचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांच्या मनावर कोरला जायचा. दुर्दैवाने वयाच्या ३१ व्या वर्षीच त्यांचं निधन झालं. स्मिता पाटील यांचा एक किस्सा जेव्हा एका स्वप्नामुळे त्यांची झोपच उडाली होती.  

 एका रात्री स्मिता पाटील यांना भयानक स्वप्न पडलं. हे स्वप्न अमिताभ बच्चन (Amirabh Bachchan) यांच्याशी संबंधित होतं ज्यामुळे स्मिता पाटीला खूप चिंतीत होत्या. अमिताभ यांच्यासोबत काही तरी वाईट होणार असल्याचा त्यांना आभास झाला.  मध्यरात्री 2 वाजता अचानक त्यांना जाग आली आणि त्यांनी थेट अमिताभ बच्चन यांना फोन केला. त्यांना कळलं की अमिताभ सध्या बंगळुरुत 'कुली' सिनेमाच्या शूटिंगसाठी गेले आहेत. म्हणून त्यांना बंगळुरुच्या हॉटेलमध्ये फोन केला. एवढ्या रात्री अभिनेत्रीचा फोन आल्याने अमिताभही घाबरले. पण स्मिता पाटील यांनी फोन केलाय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाची गोष्ट असेल म्हणत ते रिसेप्शनवर फोन घ्यायला गेले. तेव्हा स्मिता पाटील म्हणाल्या की 'तुम्ही ठीक आहात ना?' तेव्हा अमिताभ 'हो' म्हणाले. आणि पुढच्याच दिवशी अमिताभ बच्चन यांचा 'कुली'च्या सेटवर भयानक अपघात झाला.

स्मिता पाटील यांना ज्योतिष विद्या माहित होती. 'शक्ति' सिनेमाच्या शूटिंगवेळी अमिताभ यांनी स्मिता पाटील यांना हात दाखवला होता. तेव्हा त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना होणार असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं होतं. 'कुली'च्या सेटवर झालेला अमिताभ यांच्या अपघाताचा आभास स्मिता पाटील यांना आधीच झाला होता.

टॅग्स :स्मिता पाटीलबॉलिवूडअमिताभ बच्चन